West Indies Tour of India 2019 3rd T20I Mumbai Live Updates | वानखेडे मैदानावर ‘हिटमॅन’चं वादळ, झळकावलं अर्धशतक


तिरुअनंतपुरमच्या मैदानात वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाची आज कसोटी लागणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणाऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवणं हे दोन्ही संघांचं उद्दीष्ट असणार आहे. दोन्ही टी-२० सामन्यात भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीने भारताने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात संपूर्ण संघानेच निराशाजनक खेळ केला. त्यामुळे मालिकेत विजय मिळवण्यासाठी आपल्या संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुधारणं गरजेचं असल्याचं मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलं आहे.

अखेरच्या टी-२० सामन्यातही विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीजने अखेरच्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाहीये. मात्र भारतीय संघाने महत्वाच्या सामन्यासाठी संघात दोन बदल केले असून रविंद्र जाडेजाच्या जागी मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेलं आहे, तर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलेलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *