Vinod Tawade Asks question on sanjay Raut and Ajit Pawar in pune scj 81 | संजय राऊतांनी अजितदादांना स्टेपनी म्हटलं तरीही समर्थक गप्प का?-तावडे


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी असल्याचे एका मुलाखतीत संबोधलं होतं. यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य करत अजित पवार यांचे समर्थक अजून गप्प का आहेत असा सवाल केला आहे. अजित पवार यांचा अवघ्या राजकीय जीवनात असा अपमान पाहिला नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

https://www.youtube.com/watch?v=P_1X3aWSjkg

विनोद तावडे म्हणाले की, संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटलं तरी अजित पवार यांचे समर्थक गप्प कसे आहेत? खुर्चीचं  मोल इतकं असतं का? असाही प्रश्न तावडे यांनी विचारला.  पुढे ते म्हणाले की, अजित पवार यांचा माझ्या राजकीय आयुष्यात असा अपमान पाहिला नाही. खरच दादा स्टेपनी आहेत. की मेन व्हील आहेत, हे समर्थकांनी सांगावं. ज्यावेळी आमच्याकडे अजित पवार आले तेव्हा ते मेन व्हील घेऊन आले होते. पण त्याचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्या हातात होता असंही तावडे म्हणाले.

First Published on January 16, 2020 9:44 pm

Web Title: vinod tawade asks question on sanjay raut and ajit pawar in pune scj 81
Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *