Three cases have been registered till now, and they are being investigated says Joy Tirkey on JNU violence scj 81 | JNU Violence : मास्क लावलेल्या हल्लेखोरांची ओळख पटली: दिल्ली पोलीस


JNU मध्ये झालेल्या हल्ल्यातील अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली आहे असं दिल्ली पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. दिल्ली पोलिसांनी काही फोटोही पत्रकार परिषदेत सादर केले. तसेच आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या आइशी घोषसह दहा जणांवर या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, “मी कोणतीही चूक केलेली नाही. माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा माझ्याकडेही माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पुरावे आहेत” असं आइशी घोषनं म्हटलं आहे.

यावेळी ३ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंतचा घटनाक्रम विशद केला. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखवलं. जॉय टिर्की डीसीपी क्राईम यांनी ही पत्रकार परिषद घेतली. आत्तापर्यंत हिंसाचार घडवणाऱ्या नऊ जणांची ओळख पटली आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

JNU मधल्या हिंसाचार प्रकरणी अनेक प्रकराची चुकीची माहिती पसरवली गेली. SFI, AISA, AISF आणि DSF या विद्यार्थी संघटनांनी काही विद्यार्थ्यांना परीक्षेचं रजिस्ट्रेशन करण्यापासून रोखलं. या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात होता. JNU मधला हिंसाचार पूर्वनियोजित होता. त्यासाठी काही व्हॉट्स अॅप ग्रुपही तयार करण्यात आले होते. मास्क लावून ज्यांनी हल्ले घडवले त्यांना ठाऊक होतं की कुठे हल्ले करायचे. कोणत्या खोल्या फोडायच्या. आत्तापर्यंत हिंसाचाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाही. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरुन आम्ही काही आरोपींची ओळख पटवली आहे. यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत ३० ते ३२ साक्षीदारांशी चर्चा केली आहे असंही जॉय टिर्की यांनी स्पष्ट केलं.

मागच्या रविवारी काही मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष आणि इतर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तेव्हापासून हा विषय देशाच्या राजकारणात पेटला आहे. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. यावरुन सध्या राजकारणही चांगलंच पेटलं आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी पक्षाला म्हणजे केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

First Published on January 10, 2020 4:54 pm

Web Title: three cases have been registered till now and they are being investigated says joy tirkey on jnu violence scj 81


Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *