Navi Mumbai Police Save Woman, who tried suicide from Vashi Bridge scj 81 | वाशी पुलावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण


वाशी येथील पुलावरुन उडी मारुन आत्महत्येच्या प्रयत्न करत असलेल्या महिलेचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत. नवी मुंबईतील तीन पोलिसांनी या महिलेचे प्राण वाचवले. पोलीस इन्स्पेक्टर बागडे, पी. एन. तांबे, पी. ए. बासरे आणि वाशी वाहतूक पोलीस खात्यात काम करणारे दांडेकर यांनी या महिलेचे प्राण वाचवले. ही महिला वाशी खाडीवर असलेल्या पुलाच्या रेलिंगवर उभी राहिली होती. ती जीव देण्याच्या प्रयत्नात होती. पोलीस जेव्हा तिला काय झाले आहे हे विचारु लागले तेव्हा तिने आरडाओरडा केला. मी आता उडी मारुन माझं आयुष्य संपवणार आहे असंही या महिलेने सांगितलं. मात्र तेवढ्यात दोन पोलीस पुढे झाले त्यांनी तिचा हात पकडला आणि मग इतर पोलिसांनी समोर येऊन या महिलेला वाचवले.

पाहा व्हिडीओ

या महिलेचे नाव काय ते अद्याप समजू शकलेले नाही. तसंच तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला हेदेखील समजू शकलेले नाही. तूर्तास या महिलेला पोलीस पुलापासून लांब गेले असून या प्रकरणी पुढील तपास त्यांनी सुरु केला आहे.

 

First Published on January 14, 2020 9:18 pm

Web Title: navi mumbai police save woman who tried suicide from vashi bridge scj 81


Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *