mountain trekkers rescued young man who fell into the valley of Sinhagad zws 70 | सिंहगडाच्या दरीत कोसळलेल्या युवकाला गिरिप्रेमी संस्थेच्या चमूने वाचवले


पुणे : सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज समाधीमागे असलेल्या कडय़ावरून कोसळून दरीमध्ये संपूर्ण रात्रभर जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला गिरिप्रेमी संस्थेच्या चमूकडून जीवनदान मिळाले.

नागपूर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात टेक महिंद्रा कंपनीत नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय प्रवीण ठाकरे गुरुवारी दुपारी एकटाच सिंहगड किल्लय़ावर फिरण्यासाठी आला होता. सूर्यास्ताचे छायाचित्र टिपताना किल्लय़ावरील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागे एमटीडीसीजवळील कडय़ावरून तो २०० ते २५० फूट दरीत खाली कोसळला. संपूर्ण रात्र तो जखमी अवस्थेत दरीतच पडून होता. दरम्यान, त्याने आपल्या नागपूरच्या मित्रांना दूरध्वनी करून अपघाताबद्दल कळविले होते. पण, त्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत गेल्याने पुढील संपर्क करू शकला नाही. त्याचे मित्र सकाळी पुण्यात पोहोचल्यावर सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी गिरिप्रेमीच्या उमेश झिरपे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

झिरपे यांनी तातडीने सूत्रे हलवून गडावर कार्यरत असलेल्या गिरिप्रेमीच्या चमूशी संपर्क करून सुटकेबद्दल कळविण्यात आले. सिद्धार्थ जाधव, अतुल मुरमुरे, स्थानिक नागरिक सांगळे, नामदेव कोंडके, समृद्धी सपकाळ, नंदू जोरकर आणि विकास जोरकर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून ठाकरे यांना गडावर सुखरूप आणले. गडावर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली व सकाळी ११ च्या सुमारास प्रवीण ठाकरे याला आपल्या मित्रांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. ठाकरे यांचा हात फ्रॅक्चर असून मणक्याला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, गिरिप्रेमीच्या चमूला माहिती मिळाल्यानंतर अवघ्या अध्र्या तासात ठाकरे याची यशस्वी सुटका केल्याने त्यांच्या जिवाचा धोका टळला.

First Published on January 11, 2020 4:52 am

Web Title: mountain trekkers rescued young man who fell into the valley of sinhagad zws 70
Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *