Millions of devotees present for Dutt Darshan akp 94 | नृसिंहवाडीत दत्त दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती


नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे बुधवारी दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. दिवसभर ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’असा जयघोष सुरू होता.

श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपसाधनेने पावन झालेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत आज पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता पंचक्रोशीतील दत्तभक्त पायी चालत दत्त दर्शनासाठी येत होते.

दत्तजयंती उत्सवानिमित्त पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक विधी करण्यात आले. पहाटे काकड आरती व प्रात:कालीन पूजा, नंतर भाविकांचे पंचामृत अभिषेक, श्रींच्या मुख्य चरणकमलांची महापूजा, पवमान पंचसूक्त पठण, रात्री उशिरा धूप-दीप आरती पालखी सोहळा असे नित्य कार्यक्रम पार पडले.

दरम्यान, दुपारी चार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वस्त्रलंकारांनी सजवून जन्मकाळ सोहळ्यासाठी मुख्य मंदिरात आणण्यात आली. यानंतर कीर्तनकार काणे बुवा यांचे कीर्तन होऊ न ठीक पाच वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. या वेळी भक्त भाविकांनी फुले, गुलाल, अबीर  यांची उधळण करून दत्त नामाचा एकच जयघोष केला.

दत्त देव संस्थान मार्फत दिवसभर महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचा २५ हजारांवर भाविकांनी लाभ घेतला. दत्त जयंतीची गर्दी लक्षात घेऊ न दर्शनाच्या पाच वेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर क्लोज सर्किट टीव्ही, सीसीटीव्ही याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस व गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त होता. आज पहाटेपासून दिवसभरात सुमारे लाखावर भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला.

First Published on December 12, 2019 6:18 am

Web Title: millions of devotees present for dutt darshan akp 94
Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *